महामुंबई शिक्षण संस्था संघटना

महामुंबई शिक्षण संस्था संघटना, ही महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाशी संलग्न असलेली एक प्रमुख संघटना आहे. मुंबईठाणे विभागातील सुमारे २०० पेक्षा अधिक खाजगी शिक्षण संस्थांचे अत्यंत प्रभावीपणे गेल्या ३९ वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत आहे. ही संघटना खासगी शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य आणि समन्वय वाढवण्यासाठी आजपर्यंत सातत्याने प्रयत्नशील राहिलेली आहे.

संघटनेच्या कार्याची पार्श्वभूमी

महामुंबई शिक्षणसंस्था संघटनेची स्थापना १९८५ मध्ये संस्थापक अध्यक्ष, आदरणीय स्वर्गीय श्री. . . राऊत सर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली झालेली आहे. स्व. श्री. राऊत सर यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल १९९४ मध्ये केंद्रशासनाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे शैक्षणिक विचार आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे महामुंबई शिक्षणसंस्था संघटना शैक्षणिक विश्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

संस्थेची मुख्य उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत:

प्रतिनिधित्व आणि शैक्षणिक सहकार्य: खासगी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधित्व करून विशेषतः महापालिका, राज्य शिक्षण विभाग यांच्या मध्ये समन्वय साधणे.

  • समस्या निराकरण: खासगी शैक्षणिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांच्यात उद्भवणाऱ्या समस्या सोडवणे, शैक्षणिक कामकाजामध्ये गतिशीलता आणणे आणि सलोखा प्रस्थापित करणे.
  • समन्वय आणि सहकार्य: सदस्य संस्थांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणे, व त्यांची सामूहिक कार्यक्षमता आणि प्रशासकीय कामातील परिणामकारकता वाढविण्यास सहकार्य करणे.
  • गुणवत्ता विकास: शिक्षणाच्या दर्जा मध्ये सुधारणा करण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदी नुसार आधुनिक शिक्षणपद्धती स्वीकारण्यासाठी सदस्य संस्थांना मार्गदर्शन करणे.
  • संघटनेच्या माध्यमातून आजवर मुंबईठाणे विभागातील खासगी शिक्षण संस्थांच्या विकासात मोलाचे योगदान दिले गेले आहे. संघटनेने विविध शैक्षणिक आव्हाने सहजरित्या स्वीकारून शिक्षण क्षेत्रात प्रगती घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

महामुंबई शिक्षण संस्था संघटना शिक्षण क्षेत्रासाठी सचोटी आणि वचनबद्धतेने कार्य करीत असून खासगी संस्थांना प्रशासकीय आणि धोरणसंबंधित गुंतागुंतीची परिस्थिती हाताळण्यात सहकार्य करते. शिक्षणाची समृद्ध परंपरा आणि निष्ठेसह, मुंबई आणि ठाणे विभागातील शैक्षणिक प्रगती आणि नाविन्याचा आधारस्तंभ म्हणून संघटना प्रस्थापित  झालेली आहे.