गुरुवर्य स्व. श्री. प. म. राऊत

संस्थापक- अध्यक्ष महामुंबई शिक्षण संस्था संघटना, मुंबई (1985 ते 2024)

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 1994
राष्ट्रीय शिक्षक कल्याण पुरस्कार 1991
पेशवा मोरोपंत पिंगळे जीवनगौरव पुरस्कार 2018

महामुंबई शिक्षण संस्था संघटना मुंबई व ठाणे विभाग आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे ३५वे एकदिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशन

मुंबई, ठाणे व नवी मुंबई विभागातील खाजगी शिक्षणसंस्थांच्या शैक्षणिक विकासासाठी व शिक्षणक्षेत्रात वेळोवेळी निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मराठी, इतर प्रादेशिक भाषेच्या  व इंग्रजी माध्यमाच्या सुमारे २०० पेक्षा अधिक सर्व परीक्षा मंडळांच्या, शिक्षणसंस्थांच्या परस्पर समन्वय व सहकार्याने महामुंबई शिक्षण संस्था संघटना, मुंबई, गेली ३९ वर्षे कार्यरत आहे. कार्यक्षेत्रातील महानगरपालिका, राज्यशासनाचे शिक्षण विभाग व खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यात सुसंवाद राखून खाजगी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधित्व करून त्यांच्या वेळोवेळी निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे हा महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ, पुणे या शिखरसंस्थेशी संलग्न असलेल्या महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचा प्रमुख उद्देश आहे.